Downloads provided by UsageCounts
शेतकरी बंधुनी आपल्याकडील असलेल्या जमिनीचा आरोग्य पत्रिकेचा वापर करून, खरीप हंगामात विविध पिकांसाठी एकात्मिक व संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. नसल्यास माती परिक्षण करून आपण आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करावी. या आरोग्य पत्रिकेप्रमाणे केवळ अन्नद्रव्य व्यवस्थापनच नव्हे अंतर जमिनीचे आरोग्य चांगले आहे का ? किंवा समस्यायुक्त आहे का ? हे पत्रिकेप्रमाणे सामू, क्षारता आणि मुक्त चुनखडीचे प्रमाणावरून ठरवावे. समस्यायुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी खरीप हंगामामध्ये प्राधान्य ह्यावे त्यानुसार सेंद्रिय / रासायनिक भुसुधारके, क्षार प्रतिकारक पिकाची निवड, निचरा प्रणाली आणि हिरवळीचे पिके इत्यादींचा समावेश करावा म्हणजे पिकांसाठी टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल व पर्यायाने उत्पादनात शाश्वतता येईल. बहुतांश शेतकरी बंधु माती परीक्षण न करता फक्त खत पिकाचे नियोजन करताना दिसतात त्यामुळे अपेक्षित उत्पादन साधता येत नाही व जमिनीचे आरोग्य बिघडत जाते. सर्वसाधारणपणे माती परिक्षणाद्वारे जमिनीचा सामु हा ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा, कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतांशी अन्नद्रव्य उपलब्ध होतात. विद्युतवाहकता म्हणजे मातीत विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण सर्वसाधारणपणे ०.१० ते ०.४० डेसि सायमन / मीटर (dS m-1) या दरम्यानच असावी, त्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीच्या बाजूने खोल चर खोदून क्षारांचा निचरा करावा तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण हे ४ ते ८ % पर्यंत असावे. जास्त असल्यास सूक्ष्मअन्नद्रव्यांचा शेणखतातून वापर करावा तसेच अन्नद्रव्य कार्यक्षमता वाढविण्याचा शेवटी लेखात दिलेल्या उपाय योजनांचा समावेश करावा. सेंद्रीय कर्ब हा जमिनीत ०.६० % पेक्षा जास्त असावा, तो या सर्व सामू, क्षारता व चुनखडीचे प्रमाण गुणधर्मांना चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचा गुणधर्म आहे. जमीन बरड, हलक्या, माळ रानावरील फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदून त्यामध्ये गाळाची माती भरावी मात्र या गाळ मातीचे माती परिक्षण करून त्यानुसार सामू ६.५ ते ७.५. क्षारता ०.२५ डेसि सायमन / मीटर पेक्षा कमी तर मुक्त चुनखडीचे प्रमाण ५ % पेक्षा कमी असेल तरच गाळ मातीचा वापर करावा. शाश्वत पीक उत्पादनासीठी विविध पिकांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनेसाठी विविध खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर ३० ते ३५ %, जैविक खते १५ ते २० % आणि रासायनिक खतांचा ५० ते ५५ % वापर एकत्रित केल्यास केवळ उत्पादनातच वाढ नव्हे तर जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीचे आरोग्य चांगले राहते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही एकाच स्त्रोतांचा गुणधर्म किंवा उपयुक्तता हि वेगवेगळी आहे. उदा. सेंद्रिय खते हे जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधरवितात तर जैविक खते हि जमिनीत टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवितात तर रासायनिक खतांद्वारे पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा केला जातो म्हणूनच सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा एकत्रित वापर, सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण, पिकाची फेरपालट आणि योग्य पीक पध्दतीचा अवलंब करून पिकास अन्नद्रव्य पुरविण्याच्या पध्दतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये विविध घटक येतात त्यामध्ये सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खते यांचा समावेश होतो. या सर्वांचा वापर खरीप पिकांना खालील प्रमाणे करावा (तक्ता क्र. १ व २ मध्ये दर्शविला आहे).
शेणखत, जैविक खते, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पीएसबी, सुक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड नं. I, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, खरीप हंगामातील पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे तंत्र, ट्रायकोडर्मा, माती परिक्षण, सेंद्रिय खते, अझोटोबॅक्टर, खरीफ, बीजप्रक्रिया / बेणेप्रक्रिया, रायझोबियम, जैविक खते
शेणखत, जैविक खते, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पीएसबी, सुक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड नं. I, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, खरीप हंगामातील पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे तंत्र, ट्रायकोडर्मा, माती परिक्षण, सेंद्रिय खते, अझोटोबॅक्टर, खरीफ, बीजप्रक्रिया / बेणेप्रक्रिया, रायझोबियम, जैविक खते
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
| views | 29 | |
| downloads | 13 |

Views provided by UsageCounts
Downloads provided by UsageCounts