Downloads provided by UsageCounts
सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश अशी ओळख बनवलेला भारत हा आजमितीस सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेला, तसेच कार्यक्षम व उच्चशिक्षण घेत असलेल्या, सक्षम तरुणाईचा आणि जागतिक ज्ञान महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत असलेला देश; अशी स्वतःची ओळख जगाच्या व्यासपिठावर करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. ही वाटचाल भारत करू शकत आहे कारण या देशाला असलेली तक्षशिला - नालंदा अशा प्राचिन शिक्षण पिठांची पार्श्वभूमी, अनेक दिग्गज ऋषि मुनींची साधना व त्याचे वेद-उपनिषदामधून झालेले प्रकटीकरण, आर्य चाणक्यचे अर्थशास्त्र, अष्टावक्र साधना, दासबोध, विविध नितीशास्त्रे धर्मग्रंथ तसेच अर्वाचिन काळातील इंग्रजांपासून, छ.शाहू महाराज, कर्मविर भाऊराव पाटील, महर्षि कर्वे, महात्मा फुले अशा अनेक जणांनी भारतीय शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी दिलेले योगदान यांचा नामोल्लेख करणे क्रमप्राप्त- आहे. याच पार्श्वभूमिवर आजमितीस सर्वच स्तरावर बहुचर्चित ठरत असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 20, विविध दृष्टीकोनातून वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील उपाययोजना, कृतिशिल आराखडा, वंचित समूहाला शिक्षण प्रवाहात घेण्यासाठीचे कृतिशीलतेवर आधारित प्रकल्प, तरतूदी - त्यातील त्रुटी आपल्याला विचार करायचा तसेच उपाययोजना शोधण्यात उद्युक्त करतात. या शोधनिबंधाचा प्रयत्नही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 चा विद्यार्थ्यांच्या मानसिक सुदृढतेच्या विकासातील भूमिकेवर प्रकाश टाकणारा आहे. दोन तपाहूनही अधिक काळ मानसशास्त्राचे अध्ययन व अध्यापन करण्याची भूमिका पार पाडत असताना विविध सामाजिक, आर्थिक, मानसिक स्तरावरील विद्यार्थी त्यांचा प्रगतीचा लेखा जोखा सरकारी- शासकीय व शैसणिक संस्थांचा ध्येय-धोरणे यांचा जवळून संपर्क आला, त्यातून अनुभवास आलेल्या विचारांचे व निरीक्षणाचे प्रकटीकरण या शोधनिबंधामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
| views | 1 | |
| downloads | 3 |

Views provided by UsageCounts
Downloads provided by UsageCounts