Downloads provided by UsageCounts
इतिहास, संस्कृतींच्या पाऊल खुणांचा शोध घेताना इतर अनेक साधना इतकीच महत्त्वाची ठरतात ती म्हणजे वस्तुसंग्रहालये महाराष्ट्राला संपन्न अशा अनेक वस्तुसंग्रहालयाचा वारसा लाभला आहे. म्हणूनच ज्याचा पर्यटनाच्या यादीत समावेश केलाच पाहिजे ते म्हणजे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेले सातारा शहर आणि या शहराजवळच साधारणत: 45 किलोमीटर च्याकलेचा अंतरावर कलेचा वारसा मिरवणारे एक सुंदर शहर वजा गाव आहे ते म्हणजे औंध. देश विदेशात औंध ओळखलं जातं ते म्हणजे तिथल्या नितांत सुंदर वस्तुसंग्रहालयामुळेच. त्याचे नाव आहे श्री भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालय. हे संग्रहालय देशातील इतर संग्रहालयापेक्षा थोडेसे वेगळे असे आहे. कारण इथे संग्रहित आहेत जगभरातील, देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातील अस्सल परंतु दुर्मिळ चित्रकृती, शिल्पकृती आणि ही प्रसिद्ध चित्रे,शिल्पकृतींच्या प्रतिकृती. या कला कृती साकारल्यात प्रत्यक्ष त्या त्या काळातील जगप्रसिद्ध कलाकारांनी. या कलाकृतींना इथे महाराष्ट्रात औंधला कष्टपूर्वक, कलात्मकतेने,तितक्याच सौंदर्यदृष्टीने जमवले एका मराठी संस्थानिक राजाने त्यांचे नाव श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी राजे, औंध संस्थान. हा राजा होता कलारसिक, कला इतिहास अभ्यासक, कलासंग्राहक, छायाचित्रकार, कलाकारांचा आश्रयदाता आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतः एक सिद्ध हस्त चित्रकार. आज श्री भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालय महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक वेगळे आणि खास असे संग्रहालय ठरले आहे. या संग्रहालयाच्या आवारात प्रवेश करताच दिसते ते श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधीचे तिथल्या आसमंतात असणारे मेघडम्बरीतील स्मारक रुपी अस्तित्व. त्यानंतर आहेत इतिहासाचे पाषाण रुपी साक्षीदार; अप्रतिम जैन, वैष्णव, गजलक्ष्मी इत्यादी मूर्तींचे अवशेष, प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या शिळा ज्याला “ वीरगळ” म्हणतात. ते पतिनिधनानंतर सती गेलेल्या वीरांगणांच्या “ सतीशिळा”; ‘ शिलालेख’ आणि इतर अवशेष. मुख्य इमारतीच्या समोर आवारात उभे असलेले रूपवान संगमरवरी पुतळे आणि यातून पुढे दिसतो तो या संग्रहालयाचा कमानी वरांडा. त्याच्यासमोरच प्रवेशद्वार त्यावर विराजमान असलेली रिद्धी सिद्धीसह श्री गणेशाची प्रतिमा सकळकलांची देवता.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
| views | 2 | |
| downloads | 5 |

Views provided by UsageCounts
Downloads provided by UsageCounts