Downloads provided by UsageCounts
प्रस्तावना :- कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचे स्वरूप हे त्या देशातील व्यवसायिक वर्गावर अवलंबून असते. व्यवसायाला मदत करणाया इतर व्यापारी संस्था लाभासाठी कार्यरत असतात. परंतु सहकारी संस्था मात्र समानतेच्या तत्त्वावर सभासदांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत असतात. या सहकारी संस्थांनी भारताच्या आर्थिक विकासात व समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आजच्या युगात खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे बँक व्यवसायात मोठी स्पर्धा निर्माण झालेली दिसून येते. उदारीकरणामुळे नवीन बँका स्थापन करणे सोपे झाले व त्यामुळे बँक व्यवसायामध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे नागरी सहकारी बँकांची व्यवहार्यता धोक्यात आली आहे. प्रस्तुत शोधनिबंधासाठी बदलती परिस्थिती गृहीत धरली आहे. नागरी सहकारी बँकांना आपली वित्तीय सुलभता आणि कार्यक्षमतेसाठी वित्तीय माहिती सुलभ रीतीने मिळविने अवश्यक आहे. ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक ही पारंपरिक वित्तीय पत्रके आता पुरेशी वित्तीय पत्रके दर्शविण्यात मदत करीत नाहीत. सध्या नागरी सहकारी बँकेच्या वित्तीय सुलभतेकरिता नवीन प्रतिमाने ज्यांच्यामुळे शास्त्रीय संबंध प्रस्थापित होतात ते स्वीकारणे आवश्यक आहे. आधुनिक वित्तीय साधने नागरी सहकारी बँकांचे आर्थिक विश्लेषण करण्यासाठी आवश्यक बनली आहेत. देशातील व राज्यातील नागरी सहकारी बँकाचा इतिहास पहाता अंबाजोगाई येथे दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची स्थापना 2 जून 1997 रोजी झाली. बीड जिल्हा हा औद्योगिक दृष्ट्या अविकसीत जिल्हा आहे परंतु तरी देखील येथे बँकाचा विकास झालेला आहे. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या एकूण मुख्य शाखेसह 17 शाखा असून या पूर्ण मराठवाड्यामध्ये पसरलेल्या आहेत. या सर्व शाखांच्या माध्यमातून येथील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे कार्य दीनदयाळ नागरी सहकारी बँक करीत असल्याचे दिसून येते. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या शाखा कमी असल्या तरी देखील या शाखांची कार्यपध्दती समाधानकारक आहे. या सर्व शाखांच्या माध्यमातून व्यापारी बँका प्रमाणे ग्राहकाला नाविन्यपूर्ण सेवांचा पूरवठा करुन आर्थिक व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न बँक करीत असल्याचे दिसून येते.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
| views | 2 | |
| downloads | 2 |

Views provided by UsageCounts
Downloads provided by UsageCounts