
गोषवारा- (Abstract-) बदल हा निसर्गाचा नियम असून त्यास कोणीही रोखू शकत नाही कालचा समाज हा आज नव्हता तर आजचा समाज उद्या राहणार नाही त्याचप्रमाणे मानवी गरजांचे स्वरूप सुद्धा असेच आहे. पूर्वी मानवाचे जीवन अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांपुरतच मर्यादित होते परंतु मानवाची जसजशी झपाट्याने उत्क्रांती झाली त्याच्या गरजांमध्ये सुद्धा वाढ होत गेली. असे म्हटले जाते गरज ही शोधाची जननी आहे आणि म्हणून मानव जातीच्या विकासाची सुरुवात चाकाच्या शोधा पासून सुरू होत आजच्या नवीन तंत्रज्ञानात्मक युगापर्यंत अविरत सुरू आहे. या कालखंडात मनुष्याने अधिकाधिक शोध लावून आपले जीवन जास्तीत जास्त सुखकर करण्याचा प्रयत्न केला. मानवाच्या इतर अत्यावश्यक गरजा पूर्ण होण्याबरोबरच त्याला इतरांसोबत आपले सुख, दुःख जोपासण्याची इच्छा असते. तसेच तो समाजातील इतरांशी त्याच्या विचारांचे आदान-प्रदान करत असतो याबरोबरच समाजातील इतर व्यक्तींच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना मदत व मार्गदर्शन करीत असतो म्हणून मानव हा समाजात एकमेकांशी संबंध प्रस्थापित करुन त्याच्या सुख दुःखामध्ये इतरांनी सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा असते हे करत असताना मानव सामाजिक माध्यमांचा वापर करीत असतो. काळानुसार सामाजिक माध्यमांमध्येसुद्धा बदल घडून आले आहेत.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
