Downloads provided by UsageCounts
‘महर्षी धोंडो केशव यांचे विधवांच्या संदर्भातील कार्य’ या विषयावरील शोधनिबंध लिहिताना पुढील मुद्यांवर भर दिलेला आहे. महर्षी कर्वे यांच्या कार्याचा आढावा घेण्यापूर्वी 'विधवा' ही संज्ञा समजून घेणे आवश्यक आहे. 'विधवा' या संज्ञेतून एक सांस्कृतिक विश्व समोर उभे राहते. समाजातील एक दाहक वास्तव, क्रूर पद्धती, पुरुषसत्ताक पद्धतीतून होणारा अन्याय आणि शेकडो वर्षांची परंपरा या सर्व गोष्टी ध्वनित करणारी ही संज्ञा आहे. मराठी विश्वकोश खंड -१६ नुसार 'विधवा' या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. 'पती व पत्नी यांचे वैवाहिक जीवन हे त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात येते. जिचा पती निधन पावला आहे व जिने पुन्हा लग्न केलेले नाही, अशी स्त्री म्हणजे विधवा होय.’ प्राचीन काळातील स्मृतींपासून ते एकविसाव्या शतकापर्यंतचा धावता आढावा घेतल्यानंतर विधवांची सामाजिक प्रतिष्ठा पुनर्स्थापित केली पाहिजे असे वाटणारे कर्वे हे अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठे कृतिशील विचारवंत होत. सामाजिक विचार मांडणे सोपे परंतु त्याबरहुकूम चालणे अत्यंत अवघड असते. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे अग्रणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना विधवा पुनर्विवाह क्षेत्रात सामाजिक कृती करण्याची संधी आलेली असता त्यांना ती घरच्या दबावामुळे साधता आली नाही. अशा वेळेस महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि जे अजूनही महर्षी व्हायचे होते, त्या धोंडो केशव कर्वे यांनी ही संधी साधली. शिक्षण हीच एकमेव गोष्ट विधवांच्या, स्त्री-पुरुषांच्या, समाजाच्या, देशाच्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकते यावर कर्वे यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी अनाथ बालिकाश्रम ते भारतातील पहिले महिला विद्यापीठ एवढा मोठा पल्ला गाठला. स्त्रियांचे प्रश्न फक्त स्त्रियाच सोडवू शकतात असा कोणताही अभिनिवेश न बाळगता शिक्षणाच्या माध्यमातून शेकडो वर्षांच्या वाईट प्रथा, परंपरांना मागे टाकता येते हे कर्वे यांनी स्वतःच्या उदाहरणातून व संस्थेच्या स्थापनेतून दाखवून दिले. समाजमन संकुचित करणाऱ्या प्रश्नांना पर्यायी विधायक उत्तर कसे देता येते याचा शोध या शोधनिबंधात घेतला आहे. यासाठी प्राथमिक व दुय्यम दर्जाची साधने वापरली आहेत. या साधनांचे अंतरंग व बहिरंग परीक्षण करून मांडणी केलेली आहे.
विधवा, शिक्षण, वैधव्य इत्यादी.
विधवा, शिक्षण, वैधव्य इत्यादी.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
| views | 8 | |
| downloads | 9 |

Views provided by UsageCounts
Downloads provided by UsageCounts