
भारतात आर्थिक विकासासाठी गुंतवणूक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. गुंतवणूक मुख्यतः दोन प्रकारांत विभागली जाते – सरकारी गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक. या संशोधन प्रबंधाचा उद्देश सरकारी व खाजगी गुंतवणुकीद्वारे उपलब्ध असलेल्या सुविधांचा तुलनात्मक अभ्यास करणे, त्यांचे फायदे–तोटे समजून घेणे आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने योग्य पर्यायांचे विश्लेषण करणे हा आहे.
