
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) मुळे माहितीचा प्रचंड महापूर निर्माण झाला आहे. या माहिती प्रवाहाचा योग्य उपयोग केल्यास तो ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरू शकतो; मात्र योग्य चिकित्सक विचाराशिवाय वापर केल्यास तो दिशाभूल करणारा ठरू शकतो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात “चिकित्सकविचार” हीच खरी माहिती साक्षरता मानली जाते. “कृत्रिमबु द्धिमत्तेचा माहितीसाक्षरतेवर होणारा प्रभाव” या विषयावर सदर केसस्टडी आधारित आहे. या अभ्यासामध्ये श्रीमती राजमती निमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, सांगली (कला व वाणिज्य) येथील 50 विद्यार्थिनींच्या अनुभवांचा अभ्यास करण्यात आलाआहे. कृत्रिम बुद्धिमत्ताही माहिती शोधणे, विश्लेषण करणे व सादर करणे यासर्व प्रक्रियांमध्ये प्रभावी साधन ठरत असल्याचे आढळून आले.अभ्यासातून असे दिसून आले की विद्यार्थिनी प्रामुख्याने ChatGPT, Gemini यांसारख्या AI आधारित साधनांचा वापर करीतआहेत. कृत्रिम बुद्धिमत्ते मुळे माहिती शोधण्याचा वेळ कमी झाला असून योग्य माहिती निवडणे, भाषा सुधारणे माहितीची तुलना करणेव प्रभावी सादरीकरण करणे या कौशल्यांमध्ये सकारात्मक वाढ झालेली आहे. तथापि, काही आव्हाने ही समोर आली आहेत. AI वरअतिविश्वास, कॉपी–पेस्टप्रवृत्ती, माहितीचे सखोल विश्लेषण कमी होणे व माहिती पडताळणीचे प्रमाण घटणे ही प्रमुख मर्यादा आढळून आल्या. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ही माहिती साक्षरता वाढवणारे प्रभावी साधन असले तरी तिचा जबाबदार व चिकित्सक वापर अत्यंत आवश्यक आहे.
सूचनक शब्द: कृत्रिम बुद्धिमत्ता, चिकित्सक विचार,माहिती साक्षरता, व्हर्च्युअल शिक्षक, शिक्षक प्रशिक्षण, संदर्भ कौशल्य,माहिती पडताळणी, मूल्यमापन
सूचनक शब्द: कृत्रिम बुद्धिमत्ता, चिकित्सक विचार,माहिती साक्षरता, व्हर्च्युअल शिक्षक, शिक्षक प्रशिक्षण, संदर्भ कौशल्य,माहिती पडताळणी, मूल्यमापन
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
