
सारांश “दलित स्त्री आत्मकथने आणि आधुनिक दृष्टिकोन” या शोधलेखात मराठी दलित साहित्यप्रवाहातील दलित स्त्रियांच्या आत्मकथनांचा अभ्यास केला आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे दलित समाजात निर्माण झालेल्या आत्मभानातून दलित साहित्याचा उदय झाला. आत्मकथन हा साहित्यप्रकार केवळ वैयक्तिक अनुभवांचे कथन नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तवाचे दस्तऐवजीकरण आहे.दलित आत्मकथनातून जातिव्यवस्थेमुळे होणारा अन्याय, दारिद्र्य, उपेक्षा आणि अस्पृश्यतेचे विदारक चित्रण दिसते. मात्र दलित स्त्री आत्मकथन हे अधिक व्यापक आणि वेगळे आहे, कारण दलित स्त्रीला ‘दलित’ आणि ‘स्त्री’ या दुहेरी ओळखीमुळे दुहेरी शोषणाला सामोरे जावे लागते. सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचारांचे वास्तव तिच्या लेखनातून प्रकर्षाने व्यक्त होते.मलिका अमर शेख, उर्मिला पवार, बेबी कांबळे, विमल मोरे आणि कुमुद पावडे यांच्या आत्मकथनांतून स्त्री-अस्मिता, शिक्षणासाठीचा संघर्ष, पितृसत्ताक व्यवस्थेविरोधातील भूमिका आणि आंबेडकरी विचारसरणीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. दलित स्त्री आत्मकथने ही केवळ वैयक्तिक वेदनांची कहाणी नसून समतावादी समाजरचनेच्या दिशेने वाटचाल करणारे प्रेरणादायी साहित्य आहे.
कीवर्ड्स: दलित साहित्य, दलित स्त्री आत्मकथन, आत्मभान, पितृसत्ताक व्यवस्था, दुहेरी शोषण, स्त्री-अस्मिता, आंबेडकरी विचारसरणी, सामाजिक अन्याय, जातिव्यवस्था, स्त्रीसंघर्ष, शिक्षण आणि सक्षमीकरण.
कीवर्ड्स: दलित साहित्य, दलित स्त्री आत्मकथन, आत्मभान, पितृसत्ताक व्यवस्था, दुहेरी शोषण, स्त्री-अस्मिता, आंबेडकरी विचारसरणी, सामाजिक अन्याय, जातिव्यवस्था, स्त्रीसंघर्ष, शिक्षण आणि सक्षमीकरण.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
