
सारांश सदर लेखामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेत सुचविण्यात आलेल्या समग्र प्रगतीपत्रक (360° मूल्यांकन) या संकल्पनेचा ऊहापोह करण्यात आलेला आहे. शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया असून केवळ गुणांवर आधारित मूल्यांकनाऐवजी बहुआयामी आणि बालकेंद्रित मूल्यांकनाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, क्रियात्मक, सामाजिक आणि सर्जनशील विकासाचे प्रतिबिंब दाखवते. हे प्रगतीपत्रक इतर विद्यार्थ्यांशी तुलना न करता विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करते. यात स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन, पालक अभिप्राय आणि शिक्षक मूल्यांकन यांचा समावेश असल्यामुळे 360 अंश मूल्यांकन साकार होते.हे प्रगतीपत्रक शाळा व घर यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करते. विद्यार्थ्यांच्या बलस्थाने, त्रुटी, आवडी-निवडी, संधी आणि सुधारणा क्षेत्रे स्पष्ट होतात. तसेच शिक्षकांना अध्यापन नियोजन आणि पालकांना भविष्यकालीन शैक्षणिक दिशा निश्चित करण्यास मदत होते.राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व-माध्यमिक आणि माध्यमिक स्तरांसाठी स्वतंत्र टेम्प्लेट विकसित करण्यात आले आहेत. समग्र प्रगतीपत्रक वर्षातून दोनदा भरले जाते आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचे गुणात्मक व सर्वंकष चित्र सादर करते.म्हणूनच समग्र प्रगतीपत्रक हे मूल्यांकन प्रक्रियेला नवी दिशा देणारे आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडविणारे प्रभावी साधन ठरते.
कीवर्ड्स: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020),समग्र प्रगतीपत्रक, 360° मूल्यांकन, सर्वांगीण विकास, बालकेंद्रित मूल्यांकन, स्वयंमूल्यांकन,सहाध्यायी मूल्यांकन, पालक अभिप्राय, बहुआयामी शिक्षण, शैक्षणिक नियोजन, स्तरनिहाय मूल्यांकन, गुणात्मक मूल्यांकन
कीवर्ड्स: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020),समग्र प्रगतीपत्रक, 360° मूल्यांकन, सर्वांगीण विकास, बालकेंद्रित मूल्यांकन, स्वयंमूल्यांकन,सहाध्यायी मूल्यांकन, पालक अभिप्राय, बहुआयामी शिक्षण, शैक्षणिक नियोजन, स्तरनिहाय मूल्यांकन, गुणात्मक मूल्यांकन
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
