
सारांश : ‘निवडणुकीचे बदलते स्वरूप: ई-वोटिंगच्या विश्वातील संधी आणि आव्हाने’ या लेखात पारंपारिक मतदान पद्धतीपासून ई-वोटिंगकडे होत असलेल्या संक्रमणाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या निवडणूक प्रक्रियेत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोठे बदल घडत आहेत. ई-वोटिंग ही केवळ ईव्हीएमपुरती मर्यादित नसून इंटरनेट, ब्लॉकचेन, बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि डिजिटल माध्यमांद्वारे रिमोट मतदानाची संकल्पना यामध्ये समाविष्ट आहे. लेखात ई-वोटिंगचे दोन प्रकार स्पष्ट केले आहेत—ऑफलाइन (EVM आधारित) आणि ऑनलाइन/रिमोट ई-वोटिंग. स्थलांतरित मतदार, दिव्यांग व वृद्ध नागरिक, तसेच तरुण पिढी यांना सुलभ मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणे, मतदानाची टक्केवारी वाढवणे, निवडणूक खर्चात बचत, पारदर्शकता आणि तातडीचे निकाल ही ई-वोटिंगची महत्त्वाची फायदे म्हणून अधोरेखित केली आहेत. तथापि, सायबर हल्ल्यांचा धोका, हॅकिंग, मतदाराची गोपनीयता, डिजिटल दरी, तांत्रिक साक्षरतेचा अभाव, पडताळणीची अडचण, ओळख चोरी आणि सॉफ्टवेअर त्रुटी ही गंभीर आव्हाने लेखात मांडली आहेत. ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’, ‘मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षेची पातळी वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. एकूणच, ई-वोटिंग हे भविष्यातील लोकशाहीचे प्रभावी साधन ठरू शकते; मात्र तंत्रज्ञानाबरोबरच कडक सुरक्षा व्यवस्था, कायदेशीर चौकट आणि मतदारांचा विश्वास संपादन करणे अत्यावश्यक आहे, असा निष्कर्ष लेखात मांडलेला आहे.
कीवर्ड्स: ई-वोटिंग, रिमोट वोटिंग, ईव्हीएम (EVM), ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, डिजिटल लोकशाही, मतदार गोपनीयता, मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन, एंड-टू-एंड एनक्रिप्शन, डिजिटल दरी, निवडणूक सुधारणा, मतदान टक्केवारी, पारदर्शकता, लोकशाही व्यवस्था.
कीवर्ड्स: ई-वोटिंग, रिमोट वोटिंग, ईव्हीएम (EVM), ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, डिजिटल लोकशाही, मतदार गोपनीयता, मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन, एंड-टू-एंड एनक्रिप्शन, डिजिटल दरी, निवडणूक सुधारणा, मतदान टक्केवारी, पारदर्शकता, लोकशाही व्यवस्था.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
