
हे संशोधन नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न मराठी माध्यमाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांतील ५० प्राध्यापकांवर आधारित आहे. संशोधनासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक स्वरूप स्वीकारून सर्वेक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला असून माहिती संकलनासाठी प्रश्नावली व मुलाखतींचा आधार घेण्यात आला आहे. प्राप्त माहितीचे विश्लेषण टक्केवारी व सरासरी या सांख्यिकीय तंत्रांच्या साहाय्याने करण्यात आले.संशोधन निष्कर्षांवरून असे आढळून आले की, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व अनुभव समाधानकारक असला तरी संशोधन सहभाग, नवोन्मेष, तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मर्यादित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व २०४७ दृष्टीकोनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन आढळून आला, मात्र अंमलबजावणीत अडचणी आहेत. शिक्षक शिक्षण सशक्तीकरणासाठी प्राध्यापक सशक्तीकरण, व्यावसायिक विकास, ICT-AI प्रशिक्षण व भारतीय ज्ञानपरंपरेचा प्रभावी समावेश आवश्यक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
