
नाशिक जिल्हा हा भौगोलिक, नैसर्गिक व सांस्कृतिक वैविध्याने समृद्ध असून या जिल्ह्यात आदिवासी व मागास समुदायांचे प्रमाण जास्त आढळते. आदिवासी व मागास समुदायांची उपजीविका प्रामुख्याने अल्पउत्पादक शेती, जंगलाधारित साधनसंपत्ती, असंघटित मजुरी आणि पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून आहे. तथापि, अनिश्चित हवामानातील, शेतीतील मर्यादा, रोजगाराच्या अपुऱ्या संधी आणि वाढते स्थलांतर यांमुळे त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर मर्यादा येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्र हे उपजीविकेचे विविधीकरण घडवून आणणारे एक महत्त्वपूर्ण पर्यायी साधन म्हणून पुढे येत आहे. सदर संशोधनात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व मागास प्रदेशांमध्ये पर्यटनाद्वारे उपजीविकेचे विविधीकरण कसे घडून येते, याचे विश्लेषण करण्यात आले आहे. धार्मिक, निसर्गाधारित, साहसी, सांस्कृतिक व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी, उत्पन्नवाढ, आर्थिक सुरक्षितता तसेच जीवनमानातील बदल यांचा अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासातून असे निदर्शनास येते की, पर्यटन विकासामुळे पारंपरिक उपजीविकेवरील अवलंबित्व कमी होऊन स्थानिक आदिवासी व मागास समुदायांसाठी उत्पन्नाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. तथापि, पायाभूत सुविधांचा अभाव, कौशल्य विकासाची कमतरता, भांडवलाची मर्यादा व पर्यावरणीय संवर्धनाशी संबंधित आव्हाने ही पर्यटन विकासातील प्रमुख अडथळे ठरत आहेत. त्यामुळे स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग, कौशल्याधारित प्रशिक्षण, शाश्वत पर्यटन धोरणे व शासकीय–खासगी भागीदारी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास केल्यास आदिवासी व मागास प्रदेशांच्या सर्वांगीण सामाजिक व आर्थिक विकासास चालना मिळू शकते.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
