
भारताचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा हा पर्यटन विकासाचा कणा असून तो देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रस्तुत अभ्यासात भारतीय पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांचा वारसा यांचा चिकित्सक आढावा घेण्यात आला आहे. भारतातील किल्ले, मंदिरे, लेणी, राजवाडे आणि स्मारके ही केवळ स्थापत्यकलेची उदाहरणे नसून त्या त्या काळातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनाचे सजीव दस्तऐवज आहेत. या स्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात, ज्यामुळे परकीय चलनप्राप्ती, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांना चालना मिळते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, युनेस्को यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून वारसा स्थळांचे जतन व संवर्धन केले जात असले तरी वाढते पर्यटन, शहरीकरण व दुर्लक्ष यामुळे अनेक स्थळांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शाश्वत पर्यटन धोरणे राबवून ऐतिहासिक वारशाचे संरक्षण, संशोधन आणि पर्यटन विकास यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे.
भारतीय पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा, वारसा संवर्धन, पर्यटन विकास, शाश्वत पर्यटन, परकीय चलन, रोजगारनिर्मिती, स्थापत्यकला, सामाजिक व आर्थिक विकास, पुरातत्त्व संशोधन, पर्यटन उद्योग.
भारतीय पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा, वारसा संवर्धन, पर्यटन विकास, शाश्वत पर्यटन, परकीय चलन, रोजगारनिर्मिती, स्थापत्यकला, सामाजिक व आर्थिक विकास, पुरातत्त्व संशोधन, पर्यटन उद्योग.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
