
पर्यटन ही आधुनिक काळात आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगतीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानली जाते; मात्र तिची संकल्पनात्मक मुळे इतिहासात खोलवर घट्ट झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पर्यटन ही स्वतंत्र वैज्ञानिक संकल्पना म्हणून विकसित झाली नसली, तरी प्रवास, धार्मिक यात्रा, व्यापार, सागरी दळणवळण व किल्ले-दर्शन या माध्यमातून पर्यटनाच्या मूलभूत घटकांचा सर्वसमावेशक वापर झालेला आढळतो. शिवकालीन प्रशासनाने सुरक्षितता, लोककल्याण, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक सहिष्णुता यांना प्राधान्य दिल्यामुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व संघटित झाला. या संशोधनात शिवकालीन काळातील पर्यटनाशी संबंधित घटक—किल्ले, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, व्यापारी मार्ग व सागरी बंदरे यांचा ऐतिहासिक, सामाजिक व प्रशासकीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. तसेच शिवकालीन धोरणांचा आधुनिक पर्यटन व्यवस्थेवर झालेला प्रभाव तपासण्यात आला आहे. हा अभ्यास स्पष्ट करतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन केवळ राजकीय व लष्करी दृष्ट्या प्रभावी नव्हते, तर ते सांस्कृतिक व पर्यटनात्मक दृष्टीनेही दूरगामी परिणाम घडवणारे होते. आधुनिक महाराष्ट्रातील वारसा पर्यटन, धार्मिक पर्यटन व सागरी पर्यटन यांची मुळे शिवकालीन व्यवस्थेत शोधता येतात, हे या संशोधनाचे प्रमुख निष्कर्ष आहेत.
शिवकालीन पर्यटन संकल्पना, छत्रपती शिवाजी महाराज, वारसा पर्यटन, किल्ले पर्यटन, धार्मिक पर्यटन, सागरी पर्यटन, प्रवास व दळणवळण, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारसा, आधुनिक पर्यटन व्यवस्था, शाश्वत पर्यटन, महाराष्ट् पर्यटन
शिवकालीन पर्यटन संकल्पना, छत्रपती शिवाजी महाराज, वारसा पर्यटन, किल्ले पर्यटन, धार्मिक पर्यटन, सागरी पर्यटन, प्रवास व दळणवळण, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारसा, आधुनिक पर्यटन व्यवस्था, शाश्वत पर्यटन, महाराष्ट् पर्यटन
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
