
हा संशोधन लेख कब्बडी व खो-खो खेळणाऱ्या स्त्री आणि पुरुष खेळाडूंमधील आक्रमकतेच्या प्रमाणाचे तुलनात्मक अध्ययन करतो. आक्रमकता ही केवळ नकारात्मक नसून काही प्रमाणात सकारात्मक प्रेरणाही असू शकते, असा मानसशास्त्रीय दृष्टिकोन या अभ्यासात स्वीकारला आहे. संशोधनासाठी महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या कब्बडी व खो-खो खेळाडूंचा नमुना निवडण्यात आला. मध्यमान, प्रमाण विचलन आणि t-चाचणी या संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करून माहितीचे विश्लेषण करण्यात आले. निष्कर्षांनुसार कब्बडी खेळणाऱ्या पुरुष खेळाडूंमध्ये स्त्रियांच्या तुलनेत आक्रमकतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आढळले, तर खो-खो खेळणाऱ्या स्त्री व पुरुष खेळाडूंमध्ये आक्रमकतेच्या पातळीत कोणताही महत्त्वपूर्ण फरक आढळला नाही. या अभ्यासातून विविध क्रीडा प्रकारांमध्ये आक्रमकतेचे स्वरूप आणि लिंगानुसार त्यातील फरक समजून घेण्यास मदत होते.
आक्रमकता, कब्बडी, खो-खो, स्त्री खेळाडू, पुरुष खेळाडू, तुलनात्मक अध्ययन, क्रीडा मानसशास्त्र, t-चाचणी.
आक्रमकता, कब्बडी, खो-खो, स्त्री खेळाडू, पुरुष खेळाडू, तुलनात्मक अध्ययन, क्रीडा मानसशास्त्र, t-चाचणी.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
