
हा शोधनिबंध भारतीय अर्थव्यवस्थेवर वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीचा झालेला परिणाम चिकित्सक दृष्टीने अभ्यासतो. भारतात १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू करण्यात आला असून तो अप्रत्यक्ष करसुधारणेतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. जीएसटीमुळे व्हॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क, प्रवेश कर यांसारखे अनेक अप्रत्यक्ष कर रद्द होऊन संपूर्ण देशात एकसमान करप्रणाली अस्तित्वात आली. त्यामुळे करप्रणालीत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुलभता वाढली आहे. जीएसटीमुळे उत्पादन खर्चात घट, उत्पादनात वाढ, करचोरीवर नियंत्रण, करसंकलनात वाढ तसेच “एक देश – एक बाजार” ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. ग्राहक, उत्पादक आणि शासन या तिन्ही घटकांवर जीएसटीचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. तथापि, जीएसटीची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागातील जनजागृती आणि कर संक्रमणातील अडचणी दूर करणे आवश्यक आहे. एकूणच, जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी ही करप्रणाली उपयुक्त ठरत आहे, असा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे.
वस्तू व सेवा कर (GST), भारतीय अर्थव्यवस्था, अप्रत्यक्ष करप्रणाली, करसुधारणा, करसंकलन, उत्पादनवाढ, एक देश–एक बाजार, आर्थिक विकास.
वस्तू व सेवा कर (GST), भारतीय अर्थव्यवस्था, अप्रत्यक्ष करप्रणाली, करसुधारणा, करसंकलन, उत्पादनवाढ, एक देश–एक बाजार, आर्थिक विकास.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
