
सारांश भारतामधील स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीच्या तळागाळातील संस्था असून सामाजिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आरक्षण ही अत्यंत महत्त्वाची रचना आहे. ७३वी व ७४वी घटनादुरुस्तीमुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांना स्थानिक सत्तेत संरक्षित प्रतिनिधित्व देण्याची संविधानिक तरतूद झाली. तथापि, आरक्षणाच्या वाटपात अनेकवेळा राजकीय हस्तक्षेप, अति/अल्प आरक्षण, आणि अनुभवजन्य आकडेवारीचा अभाव अशा समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका निर्णायक ठरते. K. कृष्णमूर्ती (2010) या महत्वपूर्ण प्रकरणात न्यायालयाने OBC आरक्षणासाठी ‘Triple Test’ सिद्धांत मांडत वैज्ञानिक व डेटा-आधारित पद्धतीची अट घातली. महाराष्ट्रातील अलीकडील प्रकरणांमध्येही सर्वोच्च न्यायालयाने निकषांचे काटेकोर पालन न केल्यास OBC आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिले. महिला आरक्षण व आरक्षण रोटेशनबाबतही न्यायालयाने पारदर्शकता, तर्कसंगतता व संविधानिकता यांवर भर दिला. चिकित्सक दृष्टीकोनातून पाहता, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण प्रक्रियेला कायदेशीर पायाभूत मजबुती, वैज्ञानिक निकष आणि राजकीय हस्तक्षेपावर नियंत्रण दिले आहे. तथापि, राज्य सरकारांची आकडेवारी संकलनातील ढिलाई व वारंवार न्यायालयीन हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेत विलंब निर्माण होण्याचीही शक्यता राहते. एकंदरीत, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होत असले तरी, आरक्षण प्रक्रियेची गुणवत्ता राखण्यासाठी राज्यस्तरीय प्रशासन आणि न्यायालयीन मार्गदर्शन यांचे संतुलित सहकार्य अनिवार्य आहे.
कीवर्ड्स- स्थानिक स्वराज्य संस्था,निवडणूक आरक्षण, आरक्षण धोरण,राजकीय आरक्षण, तीन-स्तरीय स्थानिक शासन-ग्रामपंचायत / पंचायतराज नगरपालिका / महानगरपालिका, ओबीसी आरक्षण, महिला आरक्षण, अनुसूचित जाती/जमाती आरक्षण, ओबीसी आयोग (Dedicated Commission), 50% आरक्षण मर्यादा, संविधान 73 वा व 74 वा दुरुस्ती, राज्य सरकारची भूमिका, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, न्यायिक हस्तक्षेप, न्यायालयीन पुनरावलोकन (Judicial Review), घटनात्मक तरतुदी, प्रशासनिक कायदा, राजकीय प्रतिनिधित्व.
कीवर्ड्स- स्थानिक स्वराज्य संस्था,निवडणूक आरक्षण, आरक्षण धोरण,राजकीय आरक्षण, तीन-स्तरीय स्थानिक शासन-ग्रामपंचायत / पंचायतराज नगरपालिका / महानगरपालिका, ओबीसी आरक्षण, महिला आरक्षण, अनुसूचित जाती/जमाती आरक्षण, ओबीसी आयोग (Dedicated Commission), 50% आरक्षण मर्यादा, संविधान 73 वा व 74 वा दुरुस्ती, राज्य सरकारची भूमिका, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, न्यायिक हस्तक्षेप, न्यायालयीन पुनरावलोकन (Judicial Review), घटनात्मक तरतुदी, प्रशासनिक कायदा, राजकीय प्रतिनिधित्व.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
