
२१व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे संशोधन प्रक्रियेला नवे परिमाण देणारे सर्वात प्रभावी तंत्रज्ञान ठरले आहे. मराठी संशोधन क्षेत्रात अद्याप डिजिटल साधने, ऑनलाइन साहित्य, भाषिक संसाधने आणि संगणकीय अधिष्ठान यांचा अभाव असल्यामुळे संशोधनाची प्रक्रिया वेळखाऊ व जटिल राहिली आहे. अशा परिस्थितीत AI हे मराठी संशोधकांसाठी संजीवनीसमान ठरत असून माहिती संकलन, वर्गीकरण, भाषांतर, संक्षेप, भाषिक विश्लेषण, डेटाव्यवस्थापन, OCR–HTR, सामाजिक संशोधन आणि डेटा दृश्यांकन या अनेक पातळ्यांवर उपयुक्त ठरत आहे. AI च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात डेटा जलदगतीने प्रक्रिया करता येतो, जुने हस्तलिखित आणि दस्तऐवज डिजिटायझेशनद्वारे उपलब्ध करता येतात, मराठी भाषेतील बोलीवैविध्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करता येते, आणि संशोधनासाठी आवश्यक असलेला साहित्यसंच अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करता येतो. संशोधनाच्या गुणवत्तेत वाढ, वेळ व श्रमांची बचत, ग्रामीण–शहरी दरी कमी करणे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध करणे आणि बहुविद्याशाखीय (interdisciplinary) संशोधनाला चालना देणे अशी विविध सकारात्मक परिणाम AI मुळे दिसतात. तथापि, मराठी भाषेसाठी उपलब्ध डिजिटल डेटाचा अभाव, तंत्रज्ञानासंबंधी कौशल्यांची कमी पातळी, अनुवादातील संदर्भगम, सुरक्षा व नैतिकतेची चिंता आणि AI वर अत्याधिक अवलंबित्व यांसारखी काही आव्हानेही प्रकर्षाने जाणवतात. मराठी डिजिटल ग्रंथालये, AI संशोधन केंद्रे, WordNet–OCR विकास, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सरकारी–खाजगी सहकार्य वाढवून या मर्यादा कमी करता येतील. एकूणच, मराठी संशोधन कार्यात AI हे पूरक साधन असून पारंपरिक संशोधन परंपरा जपत आधुनिक पद्धतींच्या साहाय्याने मराठी संशोधनाला जागतिक स्तरावर नेणारे एक सक्षम शक्तिकेंद्र ठरू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मराठी संशोधन, डिजिटल ग्रंथालय, माहिती संकलन, वर्गीकरण, भाषांतर (NMT), संक्षेप (Summarization), मजकूर विश्लेषण, भाषिक संशोधन.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मराठी संशोधन, डिजिटल ग्रंथालय, माहिती संकलन, वर्गीकरण, भाषांतर (NMT), संक्षेप (Summarization), मजकूर विश्लेषण, भाषिक संशोधन.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
