
पेशवाईचा अस्त आणि ब्रिटिश राजवटीचा प्रारंभ या महत्त्वपूर्ण राजकीय घटना आणि स्थित्यंतराबरोबर भाषिक, वाङ्गयीन, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून इ.स. १८१८ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे मानले जाते. औद्यागिक आणि भौतिक सुधारणावादी ब्रिटिशांच्या भारतातील पदार्पनामुळे ब्रिटिश सत्तेबरोबर इंग्रजी भाषा, साहित्य आणि संस्कृतीही भारतात आली. इंग्रजी भाषेचा भारतीयांवरील प्रभाव, मुद्रणजोड, छापखाना विकास, नवशिक्षण पुरस्कर्ते एलफिन्स्टन, मन्-रो यांचे उदारमतवादी इंग्रजी शासकीय धोरण, त्या शासनधोरणाचा शैक्षणिक व सांस्कृतिक प्रभाव, भाषांतरयुगास प्रारंभ, अर्वाचिन ललित वाड्याचा जन्म, इंग्रजी शिक्षण व धर्मप्रसाराला विरोध करणाऱ्या एत्तदेशियांच्या वाड्यासही मिशनऱ्यांचा हातभार आणि सहकार्य ज्ञानसंपादनास आलेले महत्त्व इ. घडामोडींमुळे या कालखंडातील वातावरण ढवळून निघाले. वाक्यापासून संस्कृतीपर्यंत ब्रिटिशांचे अनुकरण सुरु झाले. इंग्रजी भाषेशी परिचय होऊन मुद्रणकलेचा शोध लागला तसतसे अनेक नवग्रंथ निर्मिती, अभिव्यक्तीचे नवे प्रकार, नवीन नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांची छपाई होऊ लागली. १९६० नंतर मराठी साहित्यात जे नवनवीन वाङ्गयीन प्रवाह निर्माण झाले त्यात दलित आंबेडकरी साहित्य प्रवाहाशी, चळवळीशी जवळचा आणि बहुतांश साम्य असणारा प्रवाह म्हणजे आदिवासी साहित्य प्रवाह! 'आदिवासी प्रतिभावंताचे मराठी साहित्य' या लेखात डॉ. श्रीपाल सबनीस म्हणतात, "दलित व आदिवासी यांच्या संबंधाने 'एक पिंजऱ्यातील तर दुसरा जंगलातील वाघ' असण्याची अर्थपूर्ण नोंद भुजंग मेश्राम करतात. दोन्ही समाजाच्या अस्मितेचे व संघर्षाचे प्रश्न सारखे असल्याने समन्वय आवश्यक असल्याचे मतही मेश्राम मांडतात, आपल्यामुळे कालबाह्य संस्कृती विरोधात लढाई करतांना प्रस्थापित व्यवस्था व साहित्या विरुध्दही संघर्ष आवश्यक असल्याचे मत मेश्राम नोंदवतात, याच संदर्भात लोकसाहित्य निर्मितीपेक्षा विद्रोही साहित्याची गरज त्यांनी प्रमाण मानली."
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
