
आदिवासींबद्दल सर्वसाधारण लोकांची कल्पना म्हणजे जंगल-दऱ्याखोऱ्यांत राहणारे रानटी, जंगली लोक. खरं पाहता आदिवासी हेच या देशाचे मूळ रहिवासी आहे. बाहेरून येणाऱ्या सबळांनी त्यांचे सखल प्रदेश व्यापले आणि त्यांना जंगल दऱ्याखोऱ्याचा आश्रय घ्यावा लागला ते कायमचे दूर झाले इतरांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे शेकडो वर्षे ते अज्ञानी आणि अशिक्षित राहिले. त्यांनी त्यांच्या मूळ संस्कृतीची मूल्ये मात्र जपली. निर्मळ अंतःकरण, प्रामाणिकपणा, मितभाषी ही बुद्ध तत्त्वज्ञानातील मुल्ये त्यांच्यामध्ये ओतपोत भरलेली आपणाला दिसतात. कारण बुद्ध म्हणतात सचित्त परियो दफनन एतं बुद्धान सासनं, म्हणजेच चित्ताची परिशुद्धता, निर्मळता हा गुण आदिवासीमध्ये आपणाला दिसतो. कारण त्यांच्याजवळ असलेली औषध वनस्पती अथवा मदत करतांना ते कसलाही भेदभाव न करता प्रामाणीकपणे आजारी व्यक्तीला औषधोपचार करतात. म्हणजेच चित्ताने ते परिशुद्ध असतात. तसेच बुद्धाच्या विचारातील निसर्गाविषयी प्रेम वृक्षाचे संवर्धन जो वृक्ष तोडेल त्याला दुप्पट दोष लागेल. असा विनय पिटकात विनय आहे. हा विनय आदिवासी लोक काटेकोरपणे जपत असतात. तसेच यज्ञामध्ये वृक्ष तोडून जाळले जात होते म्हणून यज्ञ संस्कृतीला त्यांचा विरोध होता कारण जंगल, जमीन ही त्यांची संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी त्यांना खुप संघर्ष करावा लागला. म्हणजेच त्यांची निसर्गप्रेमापासून वृत्ती ढळली नाही. वर निर्देश केल्याप्रमाणे काही लोक आदिवासींना आदिवासी न म्हणता 'वनवासी' किंवा 'गिरीजन' म्हणतात. या भूमीचे ते मूळ निवासी आहेत ही कल्पना त्यांना कदाचित रूचत नसावी. खरं पाहता या देशाचे मूळ रहिवासी मुळनिवासी वनवासी कसे असतील ? त्यांना 'वनवासी' तरी का म्हणावे? इतिहास आणि संस्कृतीसंघर्षाच्या कालचक्रात त्यांना हा वनवास कोणी दिला. वास्तविक या देशाची आदिवासी ही मूळ संस्कृती आहे. वैदिक संस्कृती त्यानंतर आली आदिवासींची श्रेष्ठ परंपरा आणि पराक्रमी इतिहासाची पाने काळाने पुसून टाकली. इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या विव्दानांना आदिवासी कधी दिसला नाही. त्यामुळेच आदिवासींचे मूळ रूप जनसामान्यापुढे आले नाही मात्र खोटा इतिहास लिहून दिशाभूल केली.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
