
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती तालुक्यातील यावली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव मंजुळा व वडिलांचे नाव बंडूजी घरी १८ विश्वे दारिद्र्य महाराजांचे जन्माची वेळी एवढं वादळ झालं की घरावरचे छप्पर देखील उडून गेले महाराजांचे जन्मनाव माणिक. महाराजांचा जन्म वरखेडवासी विदेही संत अडकुजी महाराज यांच्या कृपाप्रसादाने झाला म्हणून आई-वडिलांनी त्यांना त्यांच्या पायावर घातले त्यांच्याबरोबरच बाल मणिक पुढे तुकडे खाऊ लागला आणि पुढे माणिकचा तुकड्या झाला. बालपणी महाराज द्वाड होते शाळेपेक्षा त्यांचा ओढा शिवालयाकडे होता अभ्यासाऐवजी एकतारी व खंजिरीवर भजने म्हणण्यात त्यांचा वेळ जाई. त्यासाठी त्यांना वडिलांकडून प्रसाद मिळे एवढेच नव्हे तर कधी कधी त्यांच्या द्वाडपणाची शिक्षा त्यांचे आईसही मिळे’ मग मात्र त्यांच्या मनात कालवा कालव होई बापाचा धंदा शिंप्याचा होता मग ते मुकाटपणे काही दिवस बापाला मदत करू लागले’ परंतु वैराग्य भावना व ईश्वर दर्शनाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना यातच 1921 साली त्यांचे गुरु आडकोजी महाराज समाधीस्थ झाल्यामुळे त्यांच्यावर फार मोठा आघात झाला ते पुढे पंढरीस गेले. घरी परत आले खरे परंतु मन रमेना म्हणून 1923 साली त्यांनी रामटेक च्या जंगलाचा रस्ता धरला व पुढे फिरत फिरत चिमूरकडील जंगलात गेले तिथे ते देवबाबा या नावाने ओळखले जाऊ लागले. इसवी सन 1925 मधे त्यांना विदर्भात आणण्यात आले. त्यांनी मग देशभर दौरा केला. समाजाच जवळून निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी सालबर्डी व मोझरी येथे यज्ञे घडून आणले. सत्याग्रह शिबिरातून भजनी म्हटली. 1936 मध्ये त्यांना महात्मा गांधी यांनी आपल्या आश्रमात महिनाभर ठेवून घेतले. त्यांनी आरती मंडळाची स्थापना केली. पुढे सेवा मंडळात त्याचे परिवर्तन झाले. सेवा मंडळाद्वारे त्यांनी गावोगावी प्रार्थना ,व्यायाम, शिबिरे, चरखा, मंडळ महिलोन्नती यासारखे प्रभावी कार्य केले.
मुख्य शब्द;-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,सामाजिक योगदान,स्वातंत्र्य संग्राम,सेवा मंडळ,ग्रामगीता,व्यसनमुक्ती,राष्ट्रीय एकात्मता,मानवता,ग्राम सुधारणा,महिलांचे सबलीकरण,शिक्षण,शेतकरी व शेती,कुटुंब नियोजन,भजनी चळवळ
मुख्य शब्द;-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,सामाजिक योगदान,स्वातंत्र्य संग्राम,सेवा मंडळ,ग्रामगीता,व्यसनमुक्ती,राष्ट्रीय एकात्मता,मानवता,ग्राम सुधारणा,महिलांचे सबलीकरण,शिक्षण,शेतकरी व शेती,कुटुंब नियोजन,भजनी चळवळ
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
