
गोषवारा- जागतिक स्तरावर डाळिंब उत्पादन आणि निर्यातीत भारत अग्रणी देश आहे. भारताचे वार्षिक डाळिंब उत्पादन सुमारे ७,५०,००० टन असून त्याचा जागतिक उत्पादनातील वाटा ४१.८७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही भारतातील प्रमुख डाळिंब उत्पादक व निर्यात करणारी राज्ये आहेत. ‘भगवा’, ‘गणेश’, ‘अरक्ता’ आणि ‘मृदुला’ या जातींची निर्यातक्षमता अधिक असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना विशेष मागणी आहे. भारतातून प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, बांग्लादेश, नेदरलँड, सौदी अरेबिया आणि नेपाळ या देशांना डाळिंब निर्यात केली जाते. २०११-१२ मध्ये २,२३८ टन एवढी असलेली डाळिंब निर्यात २०२०-२१ मध्ये ३५,३११ टनांपर्यंत वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ झाली असून परकीय चलन मिळविण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. तथापि, भारतातील प्रती हेक्टर उत्पादकता इतर काही देशांच्या तुलनेत कमी असल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. या अभ्यासाद्वारे भारतातील डाळिंब उत्पादन, निर्यात प्रवृत्ती, निर्यातक्षम जाती, गुणवत्तेचे निकष आणि निर्यात बाजारपेठांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
कीवर्ड-डाळिंब उत्पादन, डाळिंब निर्यात, महाराष्ट्र, भगवा जाती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, परकीय चलन, कृषी निर्यात, गुणवत्तेचे निकष.
कीवर्ड-डाळिंब उत्पादन, डाळिंब निर्यात, महाराष्ट्र, भगवा जाती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, परकीय चलन, कृषी निर्यात, गुणवत्तेचे निकष.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
