
सारांशः- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा भारताच्या अप्रत्यक्ष कर सुधारणेतील एक ऐतिहासिक घटना आहे असे मानले जाते, कारण जीएसटीमुळे देशात अप्रत्यक्ष करामध्ये एक प्रकारची पारदर्शकता, कार्यक्षमता, एकरूपता व कर प्रशासनामुळे कर भरणा करणा-या व्यक्तिमध्ये सकारात्मक बदल दिसून आला त्यामुळे देशाच्या महसुलात वाढ झाली आहे. एकंदरीतच जीएसटीममधील सतत सुधारणा ह्या भारतीय अर्थव्यवस्थेतील परिवर्तनाची नोंदी ठरत आहे.या संशोधन पेपरमध्ये जीएसटी चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम अभ्यासत असतांना असे लक्षात आले की जीएसटी (वस्तु आणि सेवाकर) हा देशभरातील वस्तु आणि सेवांवर आकारला जाणारा एकसमान अप्रत्यक्ष कर आहे. जगामध्ये एकुण १६० देशांनी जीएसटीची अंमलबजावणी केली आहे भारत हा १६१ वा देश आहे. भारतात १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू करण्यात आला. जीएसटीमध्ये उत्पादित केला जाणारा माल व त्याची विक्री आणि पुरविण्यात येणाऱ्या सेवा यावर आकारल्या जाणाऱ्या कराऐवजी मालाच्या आणि सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी लागू करणे अशी पद्धत अवलंबिण्यात आली आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, उत्पादन शुल्क, सीमा शुल्काचे अतिरिक्त शुल्क, सीमाशुल्काचे विशेष अतिरिक्त शुल्क आणि वस्तु व सेवांच्या पुरवठ्यावरील उपकर आणि अधिभार यासारख्या केंद्रीय अप्रत्यक्ष करांची जागा जीएसटीने घेतली आहे. भारतात जीएसटीचे दर हे ०,५,१२,१८,२८ असे ठरविण्यात आले आहेत.
कीवर्ड: वस्तु आणि सेवाकर, भारत, अर्थव्यवस्था, करदर.
कीवर्ड: वस्तु आणि सेवाकर, भारत, अर्थव्यवस्था, करदर.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
