
शैक्षणिक ग्रंथालये केवळ ज्ञानाचे जतन, संवर्धन करणारी ठिकाणे राहिली नसून काळानुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ती डिजिटल संवादाची केंद्र बनली आहेत. ग्रंथालयाची पूर्वी जी पारंपरिक भूमिका होती,जसे पुस्तकांना केंद्रबिंदू मानून त्याभोवती ग्रंथालयाच्या सर्व सेवा वाचकांपर्यंत पोहचत होत्या त्यामध्ये आता आमूलाग्र बदल झाला आहे. ग्रंथालये केवळ माहिती देणारी संस्था न राहता वापरकर्त्यांची डिजिटल ओळख घडविण्यात महत्त्वाचे सहकार्य करत आहे. फेसबुक,ट्विटर, व्हॉट्सॲप, तसेच झूम, वेबीनार ,गुगल मीट या या सोशल माध्यमांचा योग्य तो उपयोग करून ग्रंथपाल त्यांच्या सेवांची तसेच नवीन संसाधनाची, शैक्षणिक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे. नव्या पिढीतील विद्यार्थी आणि इतर वापरकर्ते त्यांचा अधिकतर वेळ स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया यामध्ये घालवत आहे. त्यामुळे ग्रंथपाल सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्याशी प्रभावी संवाद साधू शकतात. ट्विटरवर वा फेसबुकची माहिती प्रसार प्रक्रिया विद्यार्थ्यांना अद्ययावत ठेवते; तर वेब-आधारित OPAC, ई-लर्निंग मॉड्यूल्स, ऑनलाइन रेफरन्स सेवा विद्यार्थ्यांना २४x७ ज्ञानसहयोग पुरवतात. ग्रंथालयातील सोशल मीडिया आणि वेब सेवांच्या या नवीन प्रवाहामुळे विद्यार्थी, अध्यापक, संशोधक यांचा शोधक दृष्टिकोन अधिक मजबूत आणि योग्य दिशेने प्रवाहित होत आहे. सोशल मीडिया आणि वेब सेवांमुळे ग्रंथालयानी भौतिक मर्यादेचे अडथळे ओलांडून वापरकर्त्यांना ग्लोबल नेटवर्कचे मार्ग खुले करून दिले आहेत. थोडक्यात, शैक्षणिक ग्रंथालयांची भूमिका आता फक्त संग्रहणापासून पुढे जाऊन संवाद, नवसृजन व सहशोधाची दिशा दाखवणारी ठरली आहे.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
