
सारांश या संशोधनप्रबंधात भारतातील शाश्वत विकासासाठीच्या योजना यांचा अभ्यास करण्यात आला आहे. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी त्यांचा टिकाऊ वापर हा शाश्वत विकासाचा मुख्य गाभा असल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 मध्ये निश्चित केलेली 17 शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी भारत विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. प्रमुख योजनांमध्ये स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाव बेटी पढाओ, प्रधानमंत्री जन-धन योजना, स्मार्ट सिटी, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, स्टार्टअप योजना, एकात्मिक बाल विकास योजना, नमामि गंगे, राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना, हरित भारत अभियान, मनरेगा इत्यादींचा समावेश आहे. या योजनांचा उद्देश गरिबी निर्मूलन, आरोग्य व शिक्षण सुधारणा, लैंगिक समानता, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांत प्रगती साधणे हा आहे. अहवालानुसार, भारताने काही क्षेत्रांत प्रगती केली आहे, विशेषतः स्वच्छ ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात, परंतु बालमृत्यू आणि लैंगिक समानता यांसारख्या क्षेत्रांत सुधारणा आवश्यक आहे. 2025 च्या संयुक्त राष्ट्र अहवालात भारताचा क्रमांक 99 होता, जो शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या बाबतीत अजूनही आव्हानात्मक स्थिती दर्शवतो.
मुख्यसंज्ञा-शाश्वत विकास,नैसर्गिक संसाधन संरक्षण,संयुक्त राष्ट्रसंघ (UN),17 शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs),भारत सरकार योजना,स्वच्छ भारत मिशन,प्रधानमंत्री आवास योजना,बेटी बचाव बेटी पढाओ,प्रधानमंत्री जन-धन योजना,स्मार्ट सिटी योजना,उज्वला योजना,आयुष्यमान भारत,स्टार्टअप इंडिया,एकात्मिक बाल विकास योजना,नमामि गंगे कार्यक्रम,राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना,हरित भारत अभियान,मनरेगा,स्वच्छ ऊर्जा,लैंगिक समानता
मुख्यसंज्ञा-शाश्वत विकास,नैसर्गिक संसाधन संरक्षण,संयुक्त राष्ट्रसंघ (UN),17 शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs),भारत सरकार योजना,स्वच्छ भारत मिशन,प्रधानमंत्री आवास योजना,बेटी बचाव बेटी पढाओ,प्रधानमंत्री जन-धन योजना,स्मार्ट सिटी योजना,उज्वला योजना,आयुष्यमान भारत,स्टार्टअप इंडिया,एकात्मिक बाल विकास योजना,नमामि गंगे कार्यक्रम,राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना,हरित भारत अभियान,मनरेगा,स्वच्छ ऊर्जा,लैंगिक समानता
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
