
पाणी पृथ्वीवरील सर्वात महत्वाची संपदा आहे. सजीव सृष्टीची उत्पत्ती पाण्या मुळे झाली, सजीव प्राणीमात्रांच्या जीवनात प्राणवायू नंतर पाण्याचा क्रम लागतो. म्हणूनच पाण्याला जीवन असे संबोधले आहे. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत असला तरी त्याचे असमान वितरण, वाढती मागणी व व्यवस्थापणाच्या अभावामुळे सध्या त्याची दुर्मिळता व दुर्भिक्ष्य जाणवू लागली आहे. जगात सध्या निम्या पेक्षा अधिक राष्ट्रे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. जागतिक बँकेचे जलतज्ञ फॅकनमार्क यांच्या निकषांनुसार प्रत्येक व्यक्तीला सर्वसाधारण वर्षभरात १७०० घन मीटर एवढे पाणी उपलब्ध पाहिजे. सध्या जगात सुमारे ५० राष्ट्रांत दरडोई फक्त १००० घन मीटर एवढे पाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जात असले तरी दुष्काळाच्या प्रश्नांवर आदयाप राज़्याला विजय मिळविता आला नाही. सध्या महाराष्ट्रात एकूण ३२६७ धरणात ४८७०५ द.ल.घ मीटर पाण्याची साठवण क्षमता निर्माण केली आहे, तरी पण केवळ एकुण लागवडी क्षेत्राच्या २२% सिंचन क्षमता महाराष्ट्रात विकसित झाले आहे. महाराष्ट्रात भारताच्या एकूण प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. शिवाय त्याचे वितरण समन्यायी तत्वानुसार होत नसल्याने प्रादेशिक वाद उद्भवताना दिसतात. यायचंच अर्थ पाण्याचे जलव्यवस्थापन योग्यरीत्या केले जात नाही. याचा सर्वात जास्त फटका मराठवाडा हा विभागाला बसला आहे. मराठवाड्यातील पाणी समस्येवर पाणी व्यवस्थापन हाच शाश्वत पर्याय आहे हे शेंबोलीच्या जलव्यवस्थापनातून सिध्द होते. शेंबोली प्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण गावाचा पाणी ताळेबंद, जलसाक्षरता वाढून डॉ परमेश्वर पौळ यांच्या जलव्यवस्थापन पद्धतीचा वापर केला तर आणि गावाचा शाश्वत विकास होइल.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
