
भारतीय स्वातंत्रलढ्याचा अभ्यास करताना आपणास एकूण तीन कालखंडाचा अभ्यास करावा लागतो.त्यामध्ये १८८५-१९०५ मवाळमतवादी कालखंड म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची झालेली स्थापना होय.त्यानंतर जहालमतवादी कालखंड १९०५-१९२० या 'कालखंडाला ''टिळकयुग' असे म्हटले जाते.व शेवटी १९२० ते १९५० पर्यंतचा कालखंड याला 'गांधीयुग'म्हटले जाते.याच काळात १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र मिळाले.या कालखंडाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते. भारतीय स्वातंत्रलढ्याची सुरुवात खरे तर १८ व्या शतकातच झालेली होती. बंगालमधील समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांनी राष्ट्रवादाची सुरुवात करून प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वतःच्या राष्ट्राविषयी भावना निर्माण केली. व ख-या अर्थाने राष्ट्र, राज्य, व देश ही संकल्पना स्पष्ट झाली.१९१४-१५ पासूनच महात्मा गांधी यांनी आपल्या नेतृत्वाने सबंध भारतीय स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले. आणि त्यांनी आपल्या राजकीय तत्वज्ञानाने सर्वाना एकत्र करून सत्य अहिंसा व सत्यागृह या शस्त्राने भारताला स्वातंत्र मिळऊन दिले.तसेच क्रांती कारकानी आपल्या बलिदानाने भारत मातेला परकियांच्या जोखडातून मुक्त केले.यामध्ये महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान जगाला एक आदर्शवत तत्वज्ञान आहे. म्हणूनच त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन भावी पिढ्यांनी वाटचाल करावी हाच या शोधनिबंधांमागचा उद्देश आहे.
तत्वज्ञान, महात्मा गांधी
तत्वज्ञान, महात्मा गांधी
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
