
आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. आजच्या स्त्रीचे जीवन ध्येय फक्त माता, सून एवढ्या सांसारीक जबाबदाऱ्या न सांभळता स्वत:चे अस्तित्व शोधून आपला व्यक्तिमत्वाचा विकास घडवून गगनाला गवसनी घालण्यासाठी ती प्रयत्नशील असलेली दिसून येते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात ती यशाची पादाक्रांत करत आहे. मात्र स्त्रियांच्या आजच्या काही प्रमाणात प्राप्त झालेल्या या यशोगाथे पाठीमागे अनेक समाजसुधारकांच्या विचारांची व कार्याची पार्श्वभूमी आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री-पुरुष समानता, स्त्री शिक्षण, स्त्री विकास यासाठी कार्य केले. या ठिकाणी विशेष उल्लेख राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा करावा लागेल कारण भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये तत्कालीन परिस्थिती पाहता फार मोठ्या संख्येने स्त्रियांचा सहभाग हा महात्मा गांधींमुळेच शक्य झाला. महात्मा गांधींच्या काळात राजकीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्त्रियांनी जो सहभाग घेतला त्याचा थोडक्यात अभ्यास या शोधनिबंधाच्या माध्यमातून केलेला आहे.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
