Powered by OpenAIRE graph
Found an issue? Give us feedback
image/svg+xml art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos Open Access logo, converted into svg, designed by PLoS. This version with transparent background. http://commons.wikimedia.org/wiki/File:Open_Access_logo_PLoS_white.svg art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos http://www.plos.org/ ZENODOarrow_drop_down
image/svg+xml art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos Open Access logo, converted into svg, designed by PLoS. This version with transparent background. http://commons.wikimedia.org/wiki/File:Open_Access_logo_PLoS_white.svg art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos http://www.plos.org/
ZENODO
Article . 2023
License: CC BY
Data sources: ZENODO
ZENODO
Article . 2023
License: CC BY
Data sources: Datacite
addClaim

महात्मा गांधी यांचे सत्याग्रह विचार

महात्मा गांधी यांचे सत्याग्रह विचार

Abstract

21 व्या शतकात आपण पदार्पण केले आहोत. काळाच्या प्रवाहाबरोबर आपल्याला पुढे जायचे आहे, परंतु त्याचबरोबरच आपले पाऊल योग्य दिशेने पडत आहे याची पण काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनातील निष्ठा, ध्येये ही मूल्यांवर आधारित आहेत वा मूल्य विरहित आहेत याचा आपण शांतपणे विचार केला पाहिजे. मूल्यांवर दृढ निष्ठा बाळगणाऱ्या व साधनशुचितेला अन्य महत्व देणाऱ्या गांधीजीना आपण 'महात्मा' व 'राष्ट्रपिता' म्हणतो. भारतीय इतिहासात अनेक वंदनीय वा निंदणीय व्यक्ती होऊन गेल्या आहेत. परंतु एकाच व्यक्तीबद्दल पूज्य भावना व तेवढाच तिरस्कार असणारी व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी एकीकडे सत्य, अहिंसा, प्रेम, सर्वधर्मसमभाव यांचा उपासक पददलितांचा कैवारी म्हणून संपूर्ण जगात गांधीजींना मानाचे स्थान दिले जाते. गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ मानव म्हणून गांधीजींना ओळखले जाते. परंतु इमर्सनने एका ठिकाणी म्हटले आहे, "टुबी ग्रेट,. ईज टुबी मिसअंडरस्टुड" हे म.गांधीच्या बाबतीत शंभर टक्के खरे ठरले. गांधीजीना 'महात्मा' कवींद्र रवीद्रनाथ टागोरांनी म्हटले, तर त्यांना 'राष्ट्रपिता' ही सर्वसामान्य पदवी देशगौरव सुभाषचंद्र बोस यांनी दिली. हिदुस्थान नावाचा देशच नाही असे सर जाँन स्ट्रॅची नावाच्या प्रसिध्द लेखकाने म्हटले होते. त्यानंतर जाँन सीसी या इतिहासकाराने आफ्रिका, युरोप प्रमाणे हिदुस्थान ही भौगोलिक संज्ञा आहे, एक प्रकारचे सांस्कृतिक ऐक्य या देशात होते, पण त्यात सामान्य माणसाची संवेदना सामील नव्हती. राष्ट्रीयत्वाचे मुख्य लक्षण एकमेकाबरोबर राहण्याची फक्त तयारी नव्हे, तर इच्छा आकांक्षा हे आहे. आणि ही भावना महात्मा गांधीच्या उदयानंतर त्यांचा चळवळीमधून, विधायक कार्यक्रंमांमधून जन्माला आली. महात्मा गांधीनी "स्वातंत्र्य' या शब्दाऐवजी 'स्वराज्य' हा शब्द वापरला. स्वातंत्र्य म्हणजे Independence हे वेगळे, आणि Freedom म्हणजे मुक्ती वेगळी. सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून सामान्य माणसाला 'मुक्ती' मिळाली नाही. ही 'मुक्ती' मिळावी म्हणून गांधीनी विधायक कार्यक्रमाची संकल्पना मांडली. गांधीजीच्या मते, "विधायक कार्यक्रम हा पूर्ण स्वराज्य प्राप्त करण्याचा, सत्याचा व अहिंसेचा मार्ग आहे, याची संपूर्ण अंमलबजावणी म्हणजे 'पूर्ण स्वराज्य' होय. सत्य आणि अहिंसात्मक साधनांनी पूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची रचना करणे, म्हणजे विधायक कार्यक्रम", असे म्हणता येईल. चरखा, झाडू, सामुदायिक प्रार्थना व सत्यागृह उत्पादक शारीरिक परिश्रमाची प्रतिष्ठा मान्य व्हावी.म्हणून गांधीजीनी चरखा हे प्रतीक मानले. 'झाडू' हे सामाजिक विषमता व जात-पात, उच्चंनीच भावना संपविण्याचे साधन होते, तर सामुदायिक प्रार्थना ही परस्परांच्या किंवा एकमेकांच्या भल्यासाठी केलेली प्रार्थना असते.अन्याय व भ्रष्टाचाराला अहिंसक पध्दतीने विरोध करणे हा 'सत्याग्रहाचा' एक भाग आहे.सत्याग्रह हा सत्याचा आग्रह करणारा तर असावाच लागातो. परंतु तो जीवनात 'सत्य-ग्रहण' करणारा 'सत्यग्रही' ही असावा लागतो. सत्याग्रहात अहिंसक Restistance पेक्षाही उचित ध्येय प्राप्तीसाठी इतरांना केलेले Assistance म्हणजे सहयोगाची भावना अधिक असते.

Keywords

महात्मा गांधी, सत्याग्रह

  • BIP!
    Impact byBIP!
    selected citations
    These citations are derived from selected sources.
    This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
    0
    popularity
    This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network.
    Average
    influence
    This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
    Average
    impulse
    This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network.
    Average
Powered by OpenAIRE graph
Found an issue? Give us feedback
selected citations
These citations are derived from selected sources.
This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
BIP!Citations provided by BIP!
popularity
This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network.
BIP!Popularity provided by BIP!
influence
This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
BIP!Influence provided by BIP!
impulse
This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network.
BIP!Impulse provided by BIP!
0
Average
Average
Average