
भारत हा 80% खेड्यामध्ये वसलेला, जगामध्ये मोठी लोकसंख्या म्हणून ओळखला जाणारा देश, अधिक तरुणांचा देश म्हणून सुद्धा ओळखला जातो. भारतातले जवळजवळ 80% लोक शेती करतात व 20 टक्के लोक वेगवेगळे व्यवसाय करतात पण भारताच दुर्दैव असं आहे की 80% असलेल्या शेती व्यवसायाच्या सुधारणेकडे म्हणावे तेवढे सरकारी यंत्रणेचे लक्ष दिसून येत नाही. त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी दिसून येते, ही गरिबी दूर करायची असेल तर शेतीकडे आणि शेतकऱ्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे सर्वच राजकारणी जोपर्यंत शेतीकडे व शेतकऱ्याकडे पुरेपूर लक्ष देणार नाहीत तोपर्यंत देशातली गरिबी दूर होणार नाही, असा माझा ठोस दावा आहे. महात्मा गांधीजींनी रामराज्याचे स्वप्न खेडे डोळ्यासमोर ठेवूनच बघितलेलं होतं. भारत देशामध्ये अनेक लोक शेतावरती अवलंबून आहेत. भारत देश हा मोठ्या लोकसंख्येचा देश असून त्यात बहुसंख्य तरुण आहेत आणि या सर्व तरुणांच्या हाताला काम मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु आज आपल्या देशामध्ये गरिबी निर्मूलनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक योजना राबवल्या जातात, परंतु त्या केवळ आणि केवळ कागदावरतीच राबवल्या जात आहेत. आशान गरिबी निर्मूलन कदापीही होऊ शकणार नाही. कारण देशात एवढी मोठी लोकसंख्या असताना सुद्धा या वेगवेगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी गुत्तेदार, ठेकेदार पर्यायाने सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्राचा वापर करताना दिसते.
गरिबी निर्मुलन, महात्मा गांधी, गांधी विचाराचे तात्त्विक विवेचन
गरिबी निर्मुलन, महात्मा गांधी, गांधी विचाराचे तात्त्विक विवेचन
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
